आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते संजय राऊतांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून, मेधा सोमय्या यांनी कोर्टात दाखल केलेल्या अब्रूनुकसानाच्या खटल्यात त्यांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती स्वत: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
सोमय्यांनी केले ट्वीट
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसाना दावा केला होता. संजय राऊत वारंवार मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळ्यात भ्रष्टाचार केला असा दावा करत आहेत. सोमय्यांनी या योजनेत अनेक कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे राऊतांचे म्हणणे आहे. तर किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्यांनी हे वृत्त फेटाळत संजय राऊतांविरोधात अब्रूनुकसाचा दावा केला. याची दखल घेत शिवडी कोर्टाने राऊतांना समन्स बजावत येत्या 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण
शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले होते. त्यातील 16 शौचालय बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. त्यात बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर केला आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
राऊतांनी काय केले आरोप
सोमय्या हे युवा प्रतिष्ठान चालवतात. त्यांनी टॉयलेट घोटाळ्यात बनावट कागदपत्राद्वारे खोटी बिले काढून पैसे उकळलेत. सोमय्यांनी यामध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. याच प्रकरणी मेधा सोमय्या यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.