आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांना भेटायला आले होते. त्यावेळी अर्ध्या तासानंतरच दिघे साहेबांना मृत घोषित करण्यात आले. आतमध्ये काय झाले कोणालाही माहित नाही, असा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी तसेच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत ठाणेकरांच्या मनात आजपर्यंत संभ्रमाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे गटाचे लोक आणि शिंदे गटाचेही लोक संभ्रमात आहेत. राजकारणाची पातळी घसरत चालाली आहे. स्वतःची सत्ता, पक्ष वाचवण्यासाठी जी धडपड चालली आहे त्यात रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये.
मीनाक्षी शिंदे पुढे म्हणाल्या, दोन डॉक्टरांनी रोशनी शिंदेला क्लिनचीट देऊनही वारंवार तिला खासगी रुग्णालयात दाखल करत आहेत. तिची प्रकृती ठिक असतानाही तिला गंभीर भासवले जात आहे. गर्भवती नसताना, आहे म्हणून सांगितले जाते. तिला एवढी एक्टींग करायला लावली, की तिला बोलताही येत नसल्याचे सांगितले जात आहे. हे का चालले आहे, याचे गूढ कळले नाही.
पोलिस संरक्षणाची मागणी
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, एकीकडे आजारपण दाखवले जात असताना, उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले, तर आम्हाला कळणारसुद्धा नाही, की आतमध्ये काय घडले. म्हणून आम्ही पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात सरकारी डॉक्टरांची टिम पाठवण्याची मागणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यातून सत्य काय ते बाहेर येईल अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
नेमके काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ठाण्यातील कासारवडवली परिसरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. बुधवारी रोशनी शिंदेंना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरेंसह रोशनीची भेट घेतली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.