आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडीची रणनिती ठरली:सत्तापिपासूंना सत्तेपासून दूर ठेवा, ऐक्य दाखवून द्या; शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरेंच्या आमदारांना सूचना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यसभा निवडणूकीच्या रणनितीसाठी हॉटेल ट्रायडंटमध्ये झाली बैठक; 12 अपक्ष आमदारांचीही हजेरी

कुणी कितीही काहीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून निवडून येतील आणि दिल्लीत राज्यसभेवर जाणारच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केला. तर सत्तापिपासूंना सत्तेपासून दूर ठेवा, आपले ऐक्य दाखवून द्या विजय आपला असून विजयोत्सवाची तयारी करा अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदारांना सूचना केल्या आहेत.

मुंबईतील अलिशान हाॅटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची आज सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत राजसभा निवडणुकीबाबत बरीच खलबतं झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील दिग्गज नेते, मंत्री, आमदारांसह 12 अपक्ष आमदारांनीही बैठकीला हजेरी लावली होती.

राजकारणात थोडीफार सभ्यता हवी होती- मुख्यमंत्री

सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी राजकारणात सभ्यता असायला हवी होती. राज्यसभेची निवडणूक होत आहे, बावीस ते चोवीस वर्षानंतर निवडणुक होत आहे आपण आपली परंपरा पाळायला हवी होती, ती पाळली असती तर निवडणुक टळली असती असा टोलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ आलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता महाविकास आघाडी रणनिती आखली.

दहा जूनला विजयोत्सव साजरा करणार- राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, दहा तारखेला विजयाची तयारी आम्ही करीत आहोत. मुख्यमंत्र्यांनी तशा सुचनाही आम्हाला केल्या आहेत. प्रचंड आत्मविश्वास दाखवणारी ही बैठक होती.

काय झाली खलबतं?

  • राज्यसभेच्या चारही जागा जिंकण्यासाठी आखली रणनिती
  • समान किमान कार्यक्रमावर भर दिला जाणार
  • वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना मतदान प्रक्रियेच्या दिल्या सूचना
  • किशोर जोरगेवार, गिता जैन, चंद्रकांत पाटील, संजय शिंदे, विनोद अग्रवाल, शामसुंदर शिंदे यांच्यासह 12 अपक्ष आमदारांचा समावेश
  • मतभेत एकत्र बसून सोडवा, मतदान करताना काळजी घ्या- मुख्यमंत्र्यांची सूचना
  • मतदान वाया जाणार नाही याची खबरदारी घ्या, विजय आपलाच होईल-शरद पवारांनी दिला आमदारांना विश्वास

चारही उमेदवार विजयी होतील- टोपे

शंभर टक्के महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा आमदारांनी विश्वास दिला आहे. छोट्या- मोठ्या अडचणी एकत्र येऊन सोडवू असा सल्लाही वरिष्ठ नेत्यांनी दिला असे आरोग्यमंत्री आणि औरंगाबादचे जिल्हासंपर्कमंत्री राजेश टोपे म्हणाले.

एमआयएम, सपाने फिरवली बैठकीकडे पाठ

एमआयएम, बहुजन विकास आमदार आणि समाजवादी पक्षाचे आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. आम्हाला निमंत्रण न मिळाल्याने आम्ही उपस्थित राहीलो नाही, असेही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले.

अबू आझमी उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

सपाचे दोन आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत यात अबू आझमींचा समावेश असून ते महाविकास आघाडीला पाठींबा देतात का हे मात्र अजून स्पष्ट नाही.

आमदार सुरक्षितस्थळी

घोडेबाजाराची शक्यता पाहता महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेले आहेत. शिवसेनेचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार हॉटेल वेस्टिनमध्ये मुक्कामी असणार आहेत. भाजपही आपल्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करताना दिसून येत आहेत.

मविआने छोट्या पक्षांचा सन्मान केला नाही- दरेकर

महाविकास आघाडीच्या बैठकीत आलेल्या आमदाराबाबत महाविकास आघाडी विश्वास व्यक्त करीत आहे जे आले नाही त्यांचे समर्थन नाही असे समाजावे का? असा सवालही त्यांनी केला. छोट्या पक्षाचा सन्मान कुठेही सरकारने केला नाही. अपक्षांच्या ठिकाणी महाविकास आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे अपक्षांत नाराजी आहे, टक्केवारी घेऊन निधी दिला असा आमदार जयस्वालाचा आरोप आहे हे चिंताजनक आहे. अडीच वर्षे राज्य सरकार अपक्ष आमदारांच्या संपर्कात नाहीत. हे सर्व आमदार प्रगल्भ आहेत. प्रलोभने देऊन आमदार फुटत नाही. ते त्यांच्या विवेकाने मतदान करतील असेही प्रविण दरेकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...