आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंबेडकरी चळवळीमधील नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे शिंदे आणि कवाडे युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेली अनेक दिवस उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युती होणार असे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जोगेंद्र कवाडे यांनी घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट ही राज्यातील नव्या समीकरणाची नांदी म्हणता येऊ शकते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दलित पँथरनंतर आता जोगेंद्र कवाडे यांच्यात झालेल्या तासभराच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय.
शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यात जवळपास 1 तास चर्चा झाली. यानंतर कवाडे यांनी शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. यामुळे एकेकाळी मविआत असलेले कवाडे आता शिंदे-फडणवीस यांच्यासोबत दिसणार की काय असा सवाल राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे. गेली अनेक दिवस जोगेंद्र कवाडे हे मविआवर नाराज होते. मविआ सरकार मित्रपक्षांना विसरले असा आरोपही त्यांनी केला होता.
ठाकरे आंबेडकर युतीच्या चर्चा
एकेकाळी शिवसेनेवर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे यांची जवळीक साधलीय. काही दिवसांपूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी वंचित बहूजन आघाडीकडून युतीसाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. दोन बैठका झाल्या असे सांगण्यात आले.यामुळे आता राज्यात शिवश्क्ती- भीमशक्तीचा नारा पहिले कोण देणार याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे. भविष्यात शिंदे आणि कवाडे एकत्र आल्यास आणि आंबेडकर आणि ठाकरे गट युती झाल्यास त्याचा ठाकरे गट आणि शिंदे गटाला किती फायदा होणार? त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार का हे आता पाहावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.