आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Meeting Of Thackeray Government After Raj Thackeray's Letter, Instructions To Power Companies To Charge Bills According To Slab Without Interrupting Power Supply

वाढीव वीज बील:राज ठाकरेंच्या पत्रानंतर ठाकरे सरकारची बैठक, वीजपुरवठा खंडित न करता स्लॅबनुसार बिल आकारण्याचे वीज कंपन्यांना निर्देश

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात पूर्णपणे लॉकडाऊन होतं. या काळात राज्यातील जनतेला वाढीव वीज बिल आकारण्यात आली. या मुळे सामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनाही त्रास सहन करावा लागतोय. कोरोनामुळे आधीच सामान्य व्यक्ती संकटात सापडला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय ठप्प झाले आहेत, पगार कपात केली जात आहे. अशाच जादा बिल आकारलं जात असल्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अव्वाच्या सव्वा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते. यानंतर ठाकरे सरकारची बैठक पार पडली आहे.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ऊर्जामंत्र्यांनी वीजकंपन्याना निर्देश दिले आहेत. या बैठकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता स्लॅबनुसार बिल आकारण्याचे निर्देश उर्जामंत्री श्री. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

महावितरण, बेस्टसह खासगी वीज कंपन्यांना समज द्या, अन्यथा या वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल. कोरोना असला तरी अशा विषयात मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत करून घेऊ नका, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित दिला होता. पत्रात लिहिले होते की, खासगी वीज कंपन्या असो किंवा महावितरण असे किंवा बेस्ट सर्वांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांनाक पाठवण्यात आली ती शब्दशः सामन्य माणसाटे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची सरासरी वीज बिल पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यात विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत. त्यावरुन त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल.असं या पत्रात म्हटलं गेलं होतं,