आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मनाेरुग्णाची शरद पवार यांना फोनवर जिवे मारण्याची धमकी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सतत धमकी देणारा नारायण सोनी हा मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या अगोदरपासून तो सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी फोन करून शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देत होता. याबाबत गावदेवी पोलिसांना अवगत करण्यात आले होते. मात्र कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे पवार यांचे स्वीय सहाय्यक सतिश राऊत यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना २ डिसेंबर रोजी पत्र लिहिले होते. संबधित नारायण सोनी बाबत सर्व माहिती दिली. सोनी फोनवरून अश्लाघ्य भाषेत धमकावत असल्याचे पत्रात नमूद करताना, दररोज किमान २०-२५ वेळेस हा इसम फोन करत असल्याची माहिती दिली. दिवाळीच्या दिवशी तर या इसमाने तब्बल शंभर वेळा फोन केला. त्यामुळे मनस्ताप आणि कामात व्यत्यय होत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. पोलिसांना तक्रार देवून देखील हा प्रकार थांबला नसल्याची खंत राऊत यांनी पत्रात व्यक्त केली. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...