आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना काँग्रेस अध्यक्ष करा, रामदास आठवलेंचा सल्ला

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत - आठवले

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काही दिवसांपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक सूचना केली आहे. त्यांच्या या सूचनेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा अशी सूचना आठवले यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

रामदास आठवले त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.”

दरम्यान काही दिवसांपूर्वी गांधी घराण्याव्यतिरीक्त इतर कोणाकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचा विचारही करण्यात आला होता. याला विचाराला सोनिया गांधी यांनी समर्थन देत राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले होते. मात्र सर्वांशी चर्चा केल्यानंतर पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोनिया यांच्याकडेच राहिले.

0