आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक विलीनीकरण:एचडीएफसीचे विलीनीकरण; टीसीएसला मागे टाकत दुसरी मौल्यवान कंपनी ठरणार, देशाच्या कॉर्पाेरेट इतिहासात सर्वात मोठे बँक विलीनीकरण

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठी हाउसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीचे विलीनीकरण देशाची सर्वात मोठी खासगी कर्जदाता एचडीएफसी बँकेत होईल. देशाच्या कॉर्पाेरेट इतिहासातील हे सर्वात मोठे विलीनीकरण आहे. यामुळे एचडीएफसीच्या प्रत्येक २५ इक्विटी शेअर्ससाठी एचडीएफसी बँकेचे ४२ इक्विटी शेअर मिळतील. विलीनीकरणानंतरही एचडीएफसी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक राहील. मात्र, तिसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआयच्या तुलनेत एचडीएफसीचे बाजार भांडवल दुपटीपेक्षा जास्त होईल. सोमवारी एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ९.१८ लाख कोटी आणि एचडीएफसीचे ४.८६ लाख कोटी रु. होते. विलीनीकरणानंतर १४.०४ लाख कोटींच्या संयुक्त बाजार भांडवलासह एचडीएफसी बँक टीसीएसला मागे टाकून देशाची दुसरी मौल्यवान कंपनी झाली आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ५.१८ लाख कोटी रु. आहे.

कंपनीबाजार भांडवल रिलायन्स इंडस्ट्रीज 18.01 टीसीएस 13.79 एचडीएफसी बँक 9.19 इन्फोसिस 7.92 आयसीआयसीआय बँक 5.19 स्रोत: बीएसई (मार्केट कॅप लाख काेटी रु.)

सेन्सेक्स ६० हजार पार विलीनीकरण घोषणेनंतर एचडीएफसी शेअर १६.५% आणि एचडीएफसी बँकेचे शेअर १४.३% पर्यंत वधारले. सेन्सेक्स १,३३५.०५ अंकवाढीसह ६०,६११.७४ वर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...