आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा कहर:हवामान विभागाने मुंबईसह 13 जिल्ह्यांसाठी जारी केला यलो अलर्ट; अनेक भागात पावसाला सुरुवात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारीही मुंबईत झाला पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यात परत पावसाचा कहर होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. दरम्यान, या भागात रात्री उशिरापासून हलका आणि मुसळधार पाऊस पडत आहे.

आयएमडीच्या मते, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागात विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर पुढील काही दिवसांत दक्षिण बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, किनारपट्टी आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह मध्य आणि पूर्व भारताच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बुधवारीही मुंबईत झाला पाऊस
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) नुसार, मुंबई शहरात बुधवारी सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत 32.5 मिमी पाऊस पडला. याशिवाय पूर्व उपनगरात 12.72 मिमी आणि पश्चिम उपनगरात 17.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात विशेषत: उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याचे आयएमडीचे मुंबई उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...