आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:मुंबईत येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता, ढगाळ वातावरणाचा अंदाज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरामध्ये असानी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणामध्ये त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. हवामान विभागाने मुंबईसह राज्यात काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर, मुंबईत 23 मार्चपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्यातील तापमान वाढत असून, बंगालच्या खाडी कडून येणाऱ्या हवेमुळे आर्द्रता वाढल्याने काही भागात ढगाळ वातावण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, येणाऱ्या पुढील चार दिवसापर्यंत तापमान सामान्य राहील. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

23 मार्च पर्यंत पावसाची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत 23 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर, काही भागात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातल्या तापमान घट
गेल्या 24 तासात विदर्भाच्या तापमानात घट पाहायला मिळत आहे. जवळपास 2 डिग्री तापमान खाली आले असून विदर्भात हिट वेव्हजची स्थिती हळूहळू संपत आहे. चंद्रपूर सोडता इतर जिल्ह्यात तापमान 40 च्या खाली आले आहे, त्यामुळे हिट वेव्हजचा इशारा रद्द करण्यात आला.

बंगालच्या खाडी कडून येणाऱ्या हवेच्या आर्द्रतामुळे काही भागात ढगाळ वातावण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, येणाऱ्या पुढील चार दिवसांपर्यंत तापमान सामान्य राहील.

बातम्या आणखी आहेत...