आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज म्हाडासाठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोन एजंट आरोपी बुलढाण्याचे तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील आरोपी आहे.
शनिवारी रात्री 10 वाजता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रभर चौकशी केली, त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. दुपारी शिवाजीनगर न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे
आरोपी : संतोष हरकळ , अंकुश हरकळ ( दोघे रा.बुलढाणा), प्रितेश देशमुख (पुणे)
हरकळ पेपर फुटी प्रकरणात एजंट आहे तर देशमुख म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पेपर सेट करणारा अधिकारी आहे.
म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली, मंत्री जितेंद्र आव्हाडांचं मध्यरात्री ट्वीट
काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री केले आहे. ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, 'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.