आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडा लॉटरी:म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8205 घरांसाठी लॉटरी : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8205 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. लॉटरीची जाहिरात 23 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून 14 ऑक्टोबर 2021 रोजी सोडत काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे, पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरे
या योजनेतून उपलब्ध होणारी घरे ही ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरारोड येथे, पालघर जिल्ह्यातील विरार बोळींज व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहेत.

म्हाडाच्या विभागीय मंडळातर्फे १० हजार घरांची निर्मिती करणार
राज्यातील एकंदर घरांची मागणी लक्षात घेता तसेच पुणे येथील सोडतीचे यश पाहून म्हाडातर्फे आगामी काळात नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद अशा विभागीय शहरांमध्ये १० हजार घरांची निर्मिती करण्यात येईल व ही घरे दर्जेदार असतील अशी माहितीही गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...