आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:मुंबई-पुण्यातून राज्यात कोठेही जाता येणार नाही, आता केवळ राज्याबाहेर जाण्याची परवानगी

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • परराज्यातील व्यक्ती असेल तर त्याला परराज्यात जाण्यास परवानगी

लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला असला तरी राज्य सरकारने लॉकडाऊन काळात राज्यात आणि राज्याबाहेर जाण्यासाठी काही अटींसह परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यातून मात्र राज्यात कोठेही जाता येणार नाही. मात्र, या भागात परराज्यातील व्यक्ती असेल तर त्याला मात्र परराज्यात जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगरपालिका क्षेत्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृत्यूंची संख्याही सतत वाढत आहे. त्यामुळे या भागाबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. जोपर्यंत संबंधित महानगरपालिका आयुक्त, त्यांच्या क्षेत्रातील कोरोनाबाधित प्रभागाची हद्द ठरवत नाहीत, तोपर्यंत या भागातून महाराष्ट्रात कोठेही जाता अथवा येता येणार नाही. मात्र, या प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली जाईल. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलिस ठाण्यात संपूर्ण माहितीसह, मेडिकल प्रमाणपत्रासह, अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलिस उपआयुक्तांकडे पाठवली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

पोलिस उपायुक्तांना अधिकार बहाल

राज्याच्या अन्य भागात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील पोलिस आयुक्तालय हद्दीतील अधिकार आता संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना देण्यात आलेले आहेत. पोलिस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर ) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.

बातम्या आणखी आहेत...