आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल आम्ही ताकदवान आहोत, तर त्यांनी आमच्याकडे यावे. खासदर असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्व स्वीकारावे. तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ, असे वक्तव्य संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विरोधकांची मोट बांधली जात आहे. याच धर्तीवर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला अशी ऑफर दिली आहे.
भाजपला हरवण्यासाठी देशातील जे जे लोक प्रयत्न करत आहेत त्या लोकांसाठी आम्ही आमच्याकडून जी पाहिजे ती कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत असे इम्तियाज जलील यांनी म्हटले. यापूर्वीही मविआसोबत जाण्यासाठी आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दंगल पुर्वनियोजित
संभाजीनगर येथील दंगल ही नियोजित होती, असा स्पष्ट आरोप इम्तियाज जलील यांनी केला. ते म्हणाले, या दंगलीमागे राज्यातील सत्ताधाऱ्यांसह इतर पक्ष सामील आहे. ज्या दिवशी ही दंगल घडली. त्यादिवशी संभाजीनगरमधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे होते आणि काय करत होते? याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सर्व काही सत्य समोर येईल. यासंदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र लिहून माहिती दिली. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त दोन ओळीचे उत्तर मिळाले असून यावरूनच त्यांची मानसिकता समोर येते.
कालीचरण महाराज गुंड
इम्तियाज जलील म्हणाले, कालीचारण महाराजांसारखे भगव्या कपड्यातील गुंड असून त्यांची जागा जेलमध्येच आहे. आम्हाला बोलायची परवानगी द्या, मग पाहू कोण जिंकते. या लोकांना भगव्या कपड्याच्या आडून राज्यात देशात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.