आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मंत्री अनिल परब यांचा सोमय्यांवर 100 कोटी अब्रुनुकसानीचा दावा, सोमय्यांनी आयकर विभागाला दिले मुश्रीफांच्या घोटाळ्याचे पुरावे

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर राज्याचे परिवहनमंत्री व शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी केली आहे. परब यांच्या वकील सुषमा सिंग यांनी सोमय्या यांना तशी नोटीस पाठवली असून ७२ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हाॅटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) बदल्यांचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोप केला होता. त्याबाबतचे पुरावे त्यांनी सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला दिले होते. सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सोमवारी १२७ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर मंगळवारी मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. दरम्यान, मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे २७०० पानांचे पुरावे सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईत आयकर विभागाला दिले.

शिवसेना आमदार वायकरांचाही दावा
शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा पूर्वी दाखल केला आहे. तर मुश्रीफ यांनीही सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...