आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य:महाविकास आघाडीतील कुरबुरी सुरूच, काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची ठाकरे सरकारवर नाराजी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारमधील नाराजीनाट्य संपता संपत नाहीये. यांच्यात वारंवार कुरबुरी होत असल्याचं वृत्त आहे. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे ठाकरे सरकारव नाराज असल्याचे वृत्त आहे. सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं वारंवार दिसून दितंय. अशातच संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने अशोक चव्हाण नाराज असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने एकत्र मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र तिन्ही पक्षांच्या या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात. त्यांना डावललं जातंय असे नेहमीच बोलले जाते. अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांना खुद्द चव्हाणांना विचारात न घेता मंजुरी देण्याच्या हालचाली सुरु आहेत त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असून संबंधित मंत्र्यांनाच गृहत धरत असल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. यामुळे आता अशोक चव्हाणांची ही नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय प्रय़त्न करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.