आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशात 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी कायदा आणण्याची तयारी असताना महाराष्ट्रातही असा कायदा बनवण्यासाठी भाजपने वकिली सुरू केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'लव्ह जिहाद'वरील कायद्याचे समर्थन केले आहे. तर काँग्रेस नेते आणि मंत्री असलम शेख यांनी यावर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार असा कोणताही कायदा आणणार नसल्याचे ते म्हणाले. ज्या राज्यात सरकार कायदा-व्यवस्थेसोबत काम केले जात आहे, तिथे अशा प्रकारच्या कायद्याची काही आवश्यकता नसल्याचे शेख म्हणाले. ज्या सरकारांना आपले अपयश लपवायचे आहे ते असे कायदे आणत असल्याची टीकाही असलम शेख यांनी केली आहे.
फडणवीस यांनी कायद्याचे समर्थन केले
विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, देशात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहे. भाजप सरकार नसलेल्या केरळ सरकारनेही ही बाब मान्य केली आहे. जेव्हा अशी प्रकरणे समोर येतात तेव्हा ती थांबविण्यासाठी कायदा करण्याची सरकारची जबाबदारी असते, असेही ते म्हणाले.
सोमय्या यांनीही साधला निशाणा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या कायद्याचे समर्थन केले आहे. राज्यात काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेना अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली असल्याची टीका सोमय्या यांनी केली आहे.
शिवसेनेच्या मौनावर प्रश्न
भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना गप्प आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या मुद्द्यावर काय म्हणत होते हे शिवसेना विसरली आहे. 'लव्ह जिहाद'च्या समर्थनार्थ काँग्रेसने दिलेल्या विधानांचे समर्थन करता येणार नाही. असेही ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.