आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट:शिंदे गटाने उठाव केला नसता, तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे सरकारने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीने पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती, असा टोला गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

वाढलेल्या घरात गद्दारी करणे चुकीचं आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटले होते. त्यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही पक्ष कुठे सोडला आहे. आम्ही मूळ शिवसेना आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यापद्धतीने आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळाले आहे. आम्ही पक्षांतर केलेले नाही. जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य असेल.

सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल

शिर्डीतील राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन झाल्यावर सरकार कोसळेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, अधिवेशन संपलाय पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितले जात आहे. मात्र, आमचे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास गुलाबराव यांनी व्यक्त केला.

नेमके कुणाचे आमदार फुटणार?

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बारा आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. यावर मिटकरी म्हणाले की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बारा आमदार फुटणार आहेत, पण ते कोणत्या बाजूचे हे त्यांनी चुकीचे सांगितले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे 22 आमदार फुटणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तशी तयारी केली आहे, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

बातम्या आणखी आहेत...