आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवर राजकारण:परराष्ट्र मंत्र्यांच्या मुलाच्या संघटनेने घेतली चीनकडून 3 कोटींची देणगी, कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • एस. जयशंकर यांच्या मुलाच्या संघटनेला चीनकडून 3 कोटींची देणगी मिळाल्याचा आरोप

गलवान मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे, एस. जयशंकर यांच्या मुलाच्या एका संघटनेला कथितरित्या चीनकडून 3 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. आव्हाड येथेच थांबले नाही. भारताचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोभाल यांच्याशी संबंधित संघटनेचे सुद्धा चीनशी संबंध आहेत. तरीही ते चिनी वस्तूंच्या बहिष्काराचे बोलत आहेत असा आरोप आव्हाड यांनी केला.

भाजपने काँग्रेसवर केले आहेत गंभीर आरोप

उल्लेखनीय बाब म्हणजे, चीन वादावर मोदी सरकार काहीच का बोलत नाही यावर काँग्रेस आणि विरोधी पक्ष सरकारला घेरत आहेत. तर भाजपने सुद्धा विरोधकांचे चीनशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे. भाजपने आरोप केला की काँग्रेसने आपली सत्ता असताना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीचा मोठा भाग राजीव गांधी फाउंडेशनला वळते केले. एवढेच नव्हे, तर चीनकडून डोनेशन घेउन काँग्रेस सत्ताधारी भाजपवर आरोप करत आहे असेही भारतीय जनता पक्षाने म्हटले होते.

शरद पवारांनी केला केंद्र सरकारचा बचाव

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भारत आणि चीन वादावरून राजकारण करणे योग्य नाही असे म्हटले आहे. त्यांनी सातारा येथील एका कार्यक्रमामध्ये संरक्षण मंत्री आणि केंद्र सरकारची बाजू घेतली होती. काँग्रेसचे नाव न घेता पवारांनी 1962 ला विसरू नये अशी आठवण करून दिली होती. विशेष म्हणजे, गलवान खोऱ्यात नुकतेच झालेल्या हिंसाचारात भारताचे 20 सैनिक शहीद झाले आहेत. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...