आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालाडमध्ये बांग्लादेशी, रोहिंग्या नागरिकांची संख्या वाढली:कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या, मंत्री लोढांचे पोलिसांना निर्देश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मालाड - मालवणी परिसरात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२२ रोजी समिती गठित करण्यात आली होती. त्यासमितीची आढावा बैठक घेताना बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची मालाड मालवणी परिसरात वाढती संख्या यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस विभागाने तात्काळ पावले उचलावीत, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मालवणी परिसरातील सरकारी जमिनीवर केलेला अवैध कब्जा, त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्या तसेच त्यातुन कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली अवस्था, यासर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अवैध घुसखोरांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

यावेळी उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे उपायुक्त शंकर वार, किरण दिघावकर, डीसीपी झोन ११ चे विशाल ठाकूर,शिधा वाटप अधिकारी राहुल साळुंखे यावेळी उपस्थित होते.

महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढावा

महिला व बालविकास मंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात विभागाची बैठक घेतली. बैठकीत चौथे महिला मसुदा धोरण सर्वसमावेशक बनवून, वेळेत सादर करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले. महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी विशेष लक्ष देऊ. महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे व त्यासाठी संधीची समानता उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करत आहे, असेही लोढांनी सांगितले. बैठकीला विभागाचे आयुक्त व अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...