आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची अफवा, उलट भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही परतण्यास उत्सुक - नवाब मलिक

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
नवाब मलिक - फाइल फोटो - Divya Marathi
नवाब मलिक - फाइल फोटो

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र हे वृत्त केवळ अफवा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. हे वृत्त निराधार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट केले की, ''काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन अधिकृत घोषणा करण्यात येई.''

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तत्कालीन आमदार

 • राणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर, उस्मानाबाद – पुन्हा विजयी
 • बबनराव पाचपुते – श्रीगोंदा, अहमदनगर – पुन्हा विजयी
 • वैभव पिचड – अकोले, अहमदनगर – पराभूत (आता आमदार नाही)
 • नमिता मुंदडा – केज, बीड (आधी आमदार नव्हत्या, आता विजयी)

राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेले तत्कालीन आमदार

 • भास्कर जाधव – गुहागर, रत्नागिरी – पुन्हा विजयी
 • जयदत्त क्षीरसागर – बीड, बीड – पराभूत (आता आमदार नाही)
 • पांडुरंग बरोरा – शहापूर, ठाणे – पराभूत (आता आमदार नाही)
 • दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत (आता आमदार नाही)
 • रश्मी बागल – करमाळा, सोलापूर – (आधी आमदार नव्हत्या, निवडणुकीतही पराभूत)
 • शेखर गोरे – माण, सातारा – (आधी आमदार नव्हते, निवडणुकीतही पराभूत)
बातम्या आणखी आहेत...