आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन कोठडी:मंत्री नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी 18 एप्रिलपर्यंत वाढवली, मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मलिक अटक केली होती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी १८ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या हस्तकाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यात ४ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. सोमवारी मलिक यांना हजर करण्यात आल्यानंतर न्या. आर. एन. रोकडे यांनी त्यांची कोठडी वाढवली.

बातम्या आणखी आहेत...