आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बत्ती गुल'वर ऊर्जामत्र्यांची प्रतिक्रिया:मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना येतोय संशय

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईमध्ये काही ठिकाणी अडीच तर उपनगरांमधील काही भागांमध्ये सहा ते आठ तास वीजपुरवठा खंडित झालेला होता.

राज्याची राजधानी मुंबईसह उपनगरात वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. मुंबई, नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही असे ट्वीट ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी केले आहे.

मुंबईमध्ये काही ठिकाणी अडीच तर उपनगरांमधील काही भागांमध्ये सहा ते आठ तास वीजपुरवठा खंडित झालेला होता. या प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र आता यावर नितीन राऊतांनी ट्विट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीत बिघाड झाल्यामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याचे पाहायला मिळाले होते. काही तास ही बत्ती गुल झाल्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसल्याचे पाहायला मिळाले होते. यासोबतच मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केल्याने यावर चर्चा होत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser