आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Former Energy Minister Nitin Raut, Who Was Injured In The Bharat Jodo Yatra, Shared His Experience, Said The Police Broke Down On The People

22 मिनिटे रक्तस्राव, पण कुणी आले नाही:जखमी माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी सांगितला अनुभव, म्हणाले- पोलिस लोकांवर तुटून पडले

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून मी सहभागी झालो नव्हतो. मध्यंतरी मी आजारी होतो त्यामुळे या यात्रेत जाऊ शकलो नाही. त्यानंतर मी हैदराबादला यात्रेठिकाणी पाच किमी पायी गेलो. राहुल गांधींचा ताफा आला अन् पोलिस अचानक लोकांवर तुटून पडले. त्यातील एसीपींनी माझ्या छातीवर हात ठेवला अन् चार पोलिसांनी मला जोरात धक्का दिला. मी रस्त्यावर पडल्याने जोरात मार लागला. सारखा बावीस मिनिटे रक्तस्त्राव सुरू होता, पण कुणीही आले नाही, पोलिसही धावले नाहीत असा थरारक अनुभव राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज सांगितला.

भारत जोडो यात्रेत जखमी झाल्यानंतर राऊत यांना रुग्णालयातूनही डिस्चार्ज मिळाला. या यात्रेतील थरारक घटनाक्रम त्यांनी माध्यमांना सांगितला.

पोलिस अचानक अस्वस्थ झाले

नितीन राऊत म्हणाले, मी यात्रेत सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेलो. विमानतळावर उतरल्यानंतर सरळ मी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ गेलो. तेथून चार किलोमीटरवर चारमिनारजवळून पदयात्रा सुरू होणार होती. त्यामुळे मी चार किमी पायी तेथे गेलो. राहूल गांधींचा ताफा तेथे आला. त्यावेळी तेथे खूपच गर्दी होती. गर्दी खूपच होती. त्यामुळे पोलिस एकदम अस्वस्थ झाले. त्यांना काय झाले हे माहिती नाही परंतु, ते अचानक लोकांवर तुटून पडले.

डोळ्याजवळ ईजा

नितीन राऊत म्हणाले, लोकांना पोलिस बाजूला करीत होते. मी त्यावेळी एका कडेला होतो तरीही एसीपींनी माझ्या छातीवर हात ठेवला. तेथे चार पोलिसांनीही स्वःतहून एवढ्या जोरात धक्का दिला की, मी डोक्यावर पडणार असे वाटत असतानाच मी स्वःतला सावरले, त्यामुळे डोळ्याजवळ ईजा झाली.

मदतीला आले नाही

नितीन राऊत म्हणाले, मी रस्त्यावर पडल्याने जोरात मार लागला. सारखा रक्तस्त्राव सुरू होता बावीस मिनिटे हा रक्तस्त्राव सुरू होता पण कुणीही आले नाही, पोलिसही धावले नाहीत. नंतर अल्पसंख्यांक विभागाचे आणि अनुसुचित जाती विभागाचे कार्यकर्ते आले. एकाने थंड पाण्याची बाटली दिली. ते पाणी डोक्यावर टाकले पण रक्तस्राव थांबला नाही. त्या ताफ्यातच एक रुग्णवाहिका होती. त्यात मला प्राथमिक उपचार देण्यात आले.

जखमी अवस्थेत पायीच गेले

नितीन राऊत म्हणाले, मला लोकांनी सांगितले की, रक्तस्राव थांबत नाही. तुम्ही तातडीने रुग्णालयात जा’. जवळपास दीड ते दोन किलोमीटर पायी गेल्यानंतर आम्ही चहाच्या एका टपरीवर ‘कुणाकडे गाडी आहे का?’अशी विचारणा केली. तेव्हा तो बाईक घेऊन आला. त्या बाईकवर ते मला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचार झाले”, असंही राऊत यांनी सांगितलं.

पण..डोळा वाचला!

नितीन राऊत म्हणाले, माझ्या उजव्या डोळ्यावर मला जबर मार लागला आहे. आतमध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे, पण डोळा वाचला. मी रुग्णालयात जाईपर्यंत राहुल गांधी, वेणुगोपाल राव, मल्लिकार्जुन खर्गे यांचा मला फोन आला. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मला भेटायला आले होते.

बातम्या आणखी आहेत...