आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅपवरून राजकारण:मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'नमो अ‍ॅप'वर बंदी घालण्याची केली मागणी, गोपनीयता सेटिंग्ज बदलून डेटा चोरत असल्याचा केला आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पंतप्रधानांच्या अ‍ॅपवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. फाईल फोटो - Divya Marathi
माजी मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पंतप्रधानांच्या अ‍ॅपवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. फाईल फोटो
  • भारत सरकारने नुकतेच टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसह चीनशी संबंधित 59 अ‍ॅप्सवर सोमवारी बंदी घातली

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'नमो अ‍ॅप' बंद करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत मोबाइल फोन अ‍ॅप 'नमो अ‍ॅप' गुप्तपणे गोपनीयता सेटिंग्ज बदलतात आणि अमेरिकेतील थर्ड पार्टी कंपन्यांना डेटा पाठवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. 

चव्हाण म्हणाले की, नमो अ‍ॅप भारतीयांच्या गोपनियतेचे उल्लंघन करत आहे. चव्हाण यांनी ट्वीट करत लिहिले की, "मोदी सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालून 130 कोटी भारतीयांच्या गोपनीयतेचे संरक्षण केले हे चांगले आहे. नमो अ‍ॅप देखील 22 कोटी लोकांचा डेटा गोळा करून, गोपनीयता सेटिंग्ज बदलून अमेरिकेतील थर्ड पार्टी कंपन्यांकडे पाठवून भारतीयांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करते."

सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर घातली बंदी

भारत सरकारने देशाच्या सार्वभौमत्व, अखंडतेसाठी आणि सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे सांगत टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह चीनच्या 59 अ‍ॅपवर सोमवारी बंदी घातली. भारत-चीन सीमेवर नुकत्याच गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या चकमकीमध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...