आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मंत्री तनपुरेंची लायकी काढत नीलेश राणेंची टीका, राणे-रोहित यांच्यातील ‘ट्विटर वॉर’ पेटले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणेंच्या टीकेवर तृतीयपंथी म्हणाले, बालिश बुद्धी जगाला दाखवू नका

साखर उद्योगाला मदतीच्या मुद्द्यावरून माजी खासदार नीलेश राणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांमध्ये सुरू झालेले ट्विटर वॉर चांगलेच पेटले आहे. रोहित यांच्या खोचक टि्वटला उत्तर देताना राणे यांनी थेट “लायकी’ काढली आहे. तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चक्क “हिजडा’ असा उल्लेख केला. यावरून तृतीयपंथी सारंग पुणेकर यांनी नीलेश राणे यांना चांगलेच सुनावले आहे.

साखर उद्योगाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यावर नीलेश राणे यांनी टीका केली होती. त्यावरून वादाची ठिणगी पडली. तेव्हा रोहित यांनी उत्तर दिले. नीलेश यांनी या टि्वटला उत्तर देताना कडवट शब्द वापरले. “साखरेवर बोलल्यावर एवढी मिरची का लागली? मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक नकाे खुपसत जाऊ?’ असे सुनावले होते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या वादात उडी घेत राणे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ‘राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात,’ असे तनपुरे यांनी म्हटले होते. त्यावर राेहित यांनी नीलेश राणे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे नीलेश राणे खवळले. त्यांनी एकेरी उल्लेख करत रोहितवर टीकास्त्र सोडले.

नीलेश राणेंची रोहित पवार यांच्यावर टीका

‘बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझं काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचाही ट्रेलर देईन. मग लोकच चपलेच्या प्रदर्शनात बसवतील तुला,’ असे म्हटले आहे. दरम्यान, हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

"हिजडा’ शब्दाचा अर्थ मी सांगते; तृतीयपंथीयाचे उत्तर

नीलेश राणे यांनी ट्विट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा “हिजडा’ असा उल्लेख केला. यावरून तृतीयपंथी सारंग पुणेकर यांनी नीलेश यांना सुनावलं आहे. “हिजडा’ या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या, नाही तर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा पुणेकर यांनी दिला आहे. राणे यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. वंचित, दुर्लक्षित व समाजाने नेहमीच अन्याय केलेला तृतीयपंथी वर्ग आहे. समाजकंटकांकडून तृतीयपंथीयांना कायम हिणवले जाते. मात्र, नीलेश यांनीही तृतीयपंथीयांना हिणवणे चुकीचे आहे. यावरून संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...