आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणारे पत्रकार, संपादक, वक्ते - भाष्यकार कुमार केतकर यांना वर्ष २०२१ सालचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, तर दैनिक भास्करचे विनोद यादव, पत्रकार विलास बडे, आणि शेख रिजवान शेख खलील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी गुरुवारी (ता. ६) राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. कुमार केतकर यांनी डेली ऑब्झर्व्हर, इकॉनॉमिक टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी अशा वृत्तपत्रांत उच्च पदे भूषवली आहेत. राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसाठीचा पुरस्कार न्यूज १८ लोकमत वाहिनीचे विलास बडे यांना जाहीर करण्यात आला आहे. मुद्रित माध्यम प्रतिनिधीसाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार बीड येथील दैनिक बीड रिपोर्टरचे प्रतिनिधी शेख रिजवान शेख खलील यांना जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यातील इनामी व वक्फ बोर्ड जमिनींच्या विक्रीचे उत्खनन शेख यांनी चव्हाट्यावर आणले होते.
यादव यांनी १५०० किमीचा प्रवास करून केला ग्राउंड रिपोर्ट
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक दिव्य भास्करचे विनोद यादव यांना जाहीर करण्यात आला आहे. कोरोना टाळेबंदीत मुंबई ते वाराणसी असा १५०० किमी प्रवास करत यादव यांनी ग्राउंड रिपोर्टिंग केलेे. पुरस्कार निवड समितीमध्ये लोकसत्ताचे संतोष प्रधान, लोकमतचे यदू जोशी व दिव्य मराठीचे अशोक अडसूळ यांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.