आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरलेस व्‍यव्‍हार:मंत्रालयाचा पत्रव्यवहार  आता होणार ‘पेपरलेस’, लवकरच ई-सिटिझन अॅप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही करण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र (सेंट्रल रजिस्ट्री युनिट) सुरू करण्यात येत आहे. या युनिटच्या माध्यमातून पत्रांचे स्कॅनिंग होणार असून नेमके पत्र कुठल्या विभागापर्यंत पोहोचले आहे हेही कळणार आहे. तसेच पत्राचा प्रवास आपल्या मोबाइलवर कळण्यासाठी सरकारकडून ई-सिटिझन ॲप तयार करण्यात येणार आहे. शासनाचा कारभार लवकरच कागदविरहित (पेपरलेस) करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ई-ऑफिसवर पाठवणार
मंत्रालयात फक्त टपाल देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त होणारे टपालाच्या स्वीकृतीसाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यवर्ती केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करून ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाइन पाठवले जाईल.