आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेस बारीक कापले म्हणून संतप्त १३ वर्षीय मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना भाईंदरमध्ये मंगळवारी रात्री घडली आहे.
भाईंदर पुर्वेला न्यू गोल्डन परिसरात सोनम इंद्रप्रस्थ इमारतीच्या १६ मजल्यावर पाठक कुटुंबिय राहतात. कुटुंबातील आठवीत शिकणारा शत्रुघ्न राजीव पाठक ह्या १३ वर्षांच्या मुलाला त्याच्या सख्ख्या चुलत भावाने केस कापण्यास नेले होते. परंतु केस बारीक कापल्याने ही बाब त्याला आवडली नाही आणि तो प्रचंड संतापला. त्यानंतर त्याची घरातील व्यक्तींनी समजूतही काढली.
त्यानंतर काय घडले?
संताप अनावर झाल्याने मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शत्रुघ्नने कसलाही विचार न करता बाथरूममधील छोट्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. शत्रुघ्न हा राजीव पाठक यांचा सर्वात लहान मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. सर्वात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका होता. या घटनेप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांच्या सुचनेनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पालवे करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.