आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे मिशन मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी 28 डिसेंबरला शिवतीर्थावर घेणार सभा, BMC च्या पार्श्वभुमीवर करणार संजय राऊत यांच्यासोबत चर्चा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी डिंसेबर महिन्यात मुंबई दौरा करणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधीच्या या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे.

28 डिंसेबरला काँग्रेस स्थापना दिवस आहे. आणि याच दिवशी राहुल गांधी शिवतीर्थावर येऊन सभा घेणार आहे. शिवतीर्थावर काँग्रेसने या आधी अनेक सभा घेतल्या आहेत मात्र, राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा असणार आहे. 2003 आणि 2006 साली सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सभा शिवतीर्थावर पार पडली होती.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी जरी असली तरी, येणाऱ्या महानगरपालिकेत मात्र हे पक्ष वेगळे लढणार आहे. मात्र आता राहुल गांधी हे संजय राऊत यांची भेट घेणार असून, यात कोणत्या मुद्दावर चर्चा होते. हे पाहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...