आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिशन वंदे मातरम:ब्रिटनमध्ये अडकलेल्या 326 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानातील सर्व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे

ब्रिटनमध्ये अडकलेल्या 326 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे बोइंग 777 विमान रात्री दीड वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानातील एका प्रवाशाने ट्वीट केले की, "पहिले विमान मुंबईत दाखल झाले आणि क्रू सदस्यांचा प्रवाशांशी फारसा संपर्क नव्हता. सीटवर आधीपासून नाश्ता आणि जेवणासोबत एक बचावात्मक किट देखील दिली होती. आता क्वारंटाइनची वेळ आली आहे."

या विमानात पुणे जिल्ह्यातील एकूण 65 नागरिक आहेत. सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी विमानतळावर करण्यात आलेली आहे. सदरचे नागरिक 4 बसद्वारे पुण्यातील हॉटेल सदानंद रेजन्सी, बालेवाडी- म्हाळुंगे या ठिकाणी दाखल झाले आहेत. 

महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या 20 हजार 228 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 779 लोकांनी प्राण गमावले आहे. आतापर्यंत 3 हजार 800 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या सावटाखाली सरकारने व्यवस्था सुलभ करण्यासाठी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस महाराष्ट्राबाहेर जाणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...