आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रतिक्रिया:मध्यप्रदेशात पाळणा हलल्यापासून आपल्याकडेही काहींना डोहाळे लागले, पण महाराष्ट्रात किमान पाच वर्षे 'गोड बातमी' नाही म्हणजे नाहीच : आमदार कुणाल पाटील

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा

राजस्थानात राजकीय उलथापालथ सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आणि शनिवारी गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांंच्यासह अनेक केंद्रिय मंत्र्यांची भेट घेतली. या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा रंगायला सुरूवात झाली. याच दौऱ्यावर आणि ऑपरेशन लोटसबाबत काँग्रेस नेते आणि आमदार कुणाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मध्यप्रदेशात पाळणा हलल्यापासून आपल्याकडेही काहींना डोहाळे लागले आहेत. परंतु काळजी नसावी. आता किमान पाच वर्षे ‘गोड बातमी’ नाही म्हणजे नाहीच, अशा मिश्किल प्रतिक्रियेचे ट्विट कुणाल पाटील यांनी केले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आणि शनिवारी गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा तसंच अनेक केंद्रिय मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी राजकीय चर्चा झाली नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही रस नाही. या सरकारमध्ये प्रचंड मतभेद आहेत. त्यांच्यातल्या मतभेदांमुळेच हे सरकार पडेल, असेही फडणवीस म्हणाले होते.