आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • MLA Mahesh Shinde's Secret Blast, Chief Minister Eknath Shinde's Shiv Sena Party Chief For Us; Uddhav Thackeray's Interview Was Not A Dig

आमदार महेश शिंदेंचा गौप्यस्फोट:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आमच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख; ठाकरेंची मुलाखत खणखणीत नव्हती

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्याकडे जास्त खासदार आमदार, जिल्हाप्रमुख, त्यामुळे एकनाथ शिंदे हे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, असे वक्तव्य आमदार महेश शिंदेंनी केले आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना ते म्हणाले की, ज्या दिवशी आमची उपनेत्यांची बैठक झाली, एकमुखाने पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

काय म्हणाले महेश शिंदे?
आमदार महेश शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच उद्धव ठाकरेंचा केवळ माजी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. यानंतर शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे हेच शिवसेना पक्षप्रमुख असून त्यांसाठी आम्ही सर्वांनी एकमुखाने त्यांची निवड केली आहे. खजिनदार पक्ष लुटत असताना त्याला राजपुत्राने साथ दिली असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंनी खजिना लुटला

​​​​​​सामनातून घेण्यात आलेली मुलाखत खणखणीत नव्हती असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर आदित्य ठाकरे राज्यात कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी काय केले. केवळ खजिना लुटण्याचे काम केले. राजपुत्र साथ देत होता, अशी टीका त्यांनी केली.

आम्ही अनेकदा तक्रार करायचो मात्र उद्धव ठाकरे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, आदिवासी विभागाचा 800 कोटींची निधी परस्पर वाटून घेतला, तेव्हाही ठाकरेंनी काही केले नाही, वीज दरवाढीबाबत आम्ही आंदोलन केले. मला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक फोनही केला नाही. मुख्यमंत्री लक्षच देत नव्हते. मात्र आता शिंदे यांनी राज्याचा चांगला विचार केला, राज्याच्या तिजोरीचा पैसा आता सुरक्षित आहे, असे महेश शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...