आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेश कोल्हे हत्या प्रकरणासारखा कर्जतमध्ये प्रयत्न:हिंदुंवरील हल्ले खपवून घेणार नाहीत, आरोपींना अटक करा; नितेश राणेंची मागणी

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूरनंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थक दिल्यामुळे हत्या करण्यात आली. आज अमरावतीमधील हत्या झालेल्या उमेश कोल्हेंचा तपास एनआयए करत आहे. पहिल्या दिवसांपासून जेव्हा नुपूर शर्मांची घटना घडली तेव्हापासून भाजप कुठल्याही विषयाचा समर्थन देत नाही. पण तरीही अमरावतीमध्ये कोल्हेंची हत्या करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्या निमित्ताने राज्यात असे वारंवार हल्ले होत असतील, हिंदुंना मारुन टाकले जात असेल तर आमचेही हात कुणी बांधलेले नाहीत, असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, 4 ऑगस्टला पुन्हा अमरावती सारखा प्रयत्न कर्जत अहमदनगरमध्ये करण्यात आला. प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला अण्णाभाऊ साठे यांच्या जंयतीसाठी जात असताना त्याला 10-15 मुस्लीम लोकांनी थांबवले आणि तू नुपूर शर्माचा डीपी ठेवतो, इतरही लोकांना ठेवण्यास सांगतो. असे म्हणत 10-15 जणांनी त्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात हत्यार, कोयते होते. प्रतीकवर हल्ला करुन त्यांनी त्याला बेशुद्ध पाडले, त्यांना वाटले की तो युवक तिथे मेला आहे. या हल्ल्यात प्रतीकला 35 टाके पडले असून, तो मृत्यूशी झूंज देत आहे.

अटक करण्याची मागणी

कर्जत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत होता. मात्र, काही हिंदू संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर संबंधित आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचेही नितेश राणे म्हणाले. या प्रकरणातील अनेक आरोपी फरार असून, त्या आरोपींवर कारवाई करुन अटक करावे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

हिंदुंत्व विचाराचे सरकार

सुशांत सिंग प्रकरणात नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केला होता. भाजपच्या बहुतांश आमदारांचा याला विरोध होता, मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. एखाद्या तरुणाची बदनामी झाली तर त्याच्या राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असा आरोप दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केला होता.

त्यावर पत्रकारांनी नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही हिंदुंत्वासाठी एकत्र आलो असून हे आता महाविकास आघाडीचे सरकार राहिलेले नाही. हिंदुंना जर तुम्ही आता टार्गेट केले तर आम्हीही त्याला उत्तर देऊ. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व विचाराचे सरकार आज आहे. हिंदुंत्वाचे विचार प्रखरपणे महाराष्ट्रामध्ये मजबूत झाला पाहिजे, त्यासाठी 166 आमदार एकत्र आलेले आहेत. हिंदुत्वाचे रक्षण करणे, ताकद वाढवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्यासाठी हिंदुंत्व हा विषय महत्वाचा आहे, त्यासाठी सर्व गोष्टी माफ आहे.

बातम्या आणखी आहेत...