आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • MLA Nitesh Rane Police Custody | Marathi News | After MLA Nitesh Rane Was Sentenced To Police Custody, Rane's Photo In Jail Went Viral On Social Media.

राणेंचा फोटो व्हायरल:आमदार नितेश राणेंना पोलिस कोठडीची शिक्षा सुनावल्यानंतर, राणेंचा जेलमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार नितेश राणे यांनी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवेसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी ते अडचणीत सापडले होते. त्यानंतर बुधवारी त्यांना न्यायालयाने चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान नितेश राणे यांना पोलिस कोठडी झाल्यानंतर त्यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. या फोटोत नितेश राणे हे जेलमध्ये बसुन पुस्तक वाचताना दिसत आहे.

नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली. या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारणे दिले. त्यामुळे नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली आहे.

नितेश राणे यांना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर सध्या सोशल मीडियावर त्यांचा एका फोटो वेगाने व्हायरल होत आहे. त्यात नेटकरी राणे यांच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेट करताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनीसाठी धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांना निराशा पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. सुप्रीम कोर्टाने त्यांना दहाव दिवसात जिल्हा सत्र न्यायालयात शरण जाण्यास सांगितले होते.

त्यानंतर राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण गेले होते. बुधवारी कणकवली न्यायालयाने नितशे राणे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा पाच वर्षांपूर्वीचा एक जेलमधला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...