आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाची सुनावणी पूर्ण:आमदार नितेश राणेंचा फैसला सोमवारी, तोपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील आज मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालय याप्रकरणी सोमवारी आपला फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आलेला आहे. शिवेसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहे.

सोबतच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना देखील नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधानभवनाच्या पायऱ्यावर बसुन म्यॉव म्यॉव करत खिल्ली उडवली होती. या दोन्ही घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने आज न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू करण्यात आला होता.