आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराने बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियासह रमेश लटके यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
आमदार रमेश लटके (वय 52) हे कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी दुबईत गेले होते. बुधवारी सायंकाळी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कोल्हापुरच्या शाहुवाडीचे ते मुळ रहिवासी होते. रमेश लटके यांचे पार्थिव दुबईहून मुंबईत आणले गेले. त्यानंतर आमदार भवन येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
आज सकाळी अकरा वाजता रमेश लटके यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह दर्शन घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लटके कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांनी आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजलीही वाहिली, यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही उपस्थिती होती. एक कडवट शिवसैनिक गमावल्याच्या भावना यावेळी उपस्थित शिवसेना नेत्यांनी केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.