आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी राणांचा मुख्यमंत्र्यांना निशाणा:म्हणाले -उद्धव ठाकरे हनुमान चालिसा म्हणणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार?

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी ओवैसींसह ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. हनुमान चालिसा पठन केल्याने आम्हाला तुरुंगात टाकले जाते पण अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहतात. आता देशातील प्रत्येक हिंदुचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, उद्याच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे हनुमान चालिसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार? असा खोचक सवाल रवी राणांनी विचारला आहे.

काय आहे प्रकरण ?
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्ग्यांना भेटी दिल्या. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेबाच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील भाजपचे अनेक नेते यावरुन ओवैसी आणि ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. या वादात आता आमदार रवी राणा यांनी उडी घेतली आहे.

नेमके काय म्हणाले रवी राणा ?
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा आहे.माझ्या राजकीय जीवनात त्या कबरीवर कोणी गेल्याचे मी ऐकले नाही. मात्र ठाकरे सरकाच्या काळात पहिल्यांदाच ओवैसी आले आणि औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहून गेले, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे. तसेच तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग तुमच्या राज्यात असे कसे काय घडू शकते, असा सवालही रवी राणांनी उपस्थित केला आहे.

राजद्रोहाच्या कलमाला तूर्तास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर रवी राणां म्हणाले की, आम्ही हनुमान चालिसेचे पठण केले म्हणून आमदार आणि खासदारांना जेलमध्ये टाकले. आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून जातात. असे म्हणत त्यांनी ओवैसींवर कारवाई न झाल्यांचे सांगत शिवसेनेच्या हिंदुत्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तर अतूल भातखळकर यांनी अकबरूद्दीन ओवैसीवर तात्काळ गुन्हा दाखल करणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...