आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांनी आमदारांच्या ड्रायव्हर, पीएंना केले खुश:राज्यातील आमदारांना आता 5 कोटी रुपये विकासनिधी मिळणार - अर्थमंत्री अजित पवार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात आज झालेल्या चर्चेत अजित पवारांनी आमदारांना मिळणारा विकासनिधीमध्ये वाढ केली आहे. अजित पवारांनी स्थानिक विकास निधीमध्ये वाढ केल्याने सर्वच आमदारांनी बाकांवरून उत्स्फूर्त दाद दिली, मात्र असे असतानाच मागील बाकावरील आमदारांनी पुन्हा गाड्या हव्या अशी मागणीही केली.

आमदारांना मिळणारा विकास निधी 4 कोटींवरून 5 कोटी करण्याचा निर्णय अजित पवारांनी यावेळी जाहीर केला. स्थानिक विकास निधी 5 कोटी होता. मी तो 5 कोटी जाहीर करतो. खासदारांना देखील केंद्राने 5 कोटी द्यायला का कू केली. पण आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्येक आमदारांना 5 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

आमदारांना खुश करणारा निर्णय

विकासनिधी वाढवल्याची घोषणा करताना आमदारांच्या पीए आणि ड्रायव्हरचे पगार वाढल्याचे देखील अजित पवारांनी जाहीर केले आहे. त्यामुळे 15 हजार रुपये पगार असणार्‍या ड्रायव्हरचा पगार आता 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर पीएचा 25 हजारांचा पगार आता 30 हजार करण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केले आहे.

सत्ताधारी आमदारांना हव्या पुन्हा गाड्या

अर्थमंत्री अजित पवारांनी आमदारनिधी आणि पगारवाढीबाबत घोषणा केली. यानंतर लगेच सत्ताधारी बाकांवरून काही आमदारांनी गाडी हवी अशी मागणी केली. दादा आता गाडीही हवी, अशी मागणी अजित पवारांना मागील बाकांवरून ऐकू आली. त्यावर पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये आमदारांना इलेक्ट्रिक कारची वाट बघण्याचा सल्ला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...