आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:आमदारांच्या पगारास 30% कात्री, 70 हजारांची कपात; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, एक वर्षभर पगार कपात

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आमदारांना आता १ लाख ६२ हजार रुपये पगार

काही दिवसांपूर्वी आमदारांच्या वेतनात कपात करण्याचा घेतलेला निर्णय काही कारणांमुळे स्थगित करण्यात आला होता, परंतु गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्व खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात आणि खासदार निधी २ वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. खरे तर महाराष्ट्राने केंद्राच्या आधीच २ टप्प्यांत वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात गुरुवारी बदल करत आता एप्रिल २०२१ पर्यंत राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात केली जाणार आहे.

आमदारांना आता १ लाख ६२ हजार रुपये पगार

राज्यात आमदारांना मासिक २ लाख ३२ हजार रुपये पगार मिळतो.  व्यवसाय कर व आयकर कापून उर्वरित रक्कम आमदारांना मिळते. ३०% कपातीनंतर आता आमदारांच्या पगारात ७० हजारांची कपात होईल. त्यांना दरमहा १ लाख ६२ हजार रुपये पगार मिळेल. त्यांना मार्चमध्ये ४०% पगार मिळाला. उर्वरित ६०% रक्कम पुढील पगारात दिली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...