आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:'पंकजाताईंनी दोन दिवसात चांगला अभ्यास केला, जो मला आणि इतरांना जमला नाही'- राम शिंदे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी मंत्री राम शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे

विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपने बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप करत, भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करुन दाखवली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सर्वात आधी आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर पंकजा मुंडें  आणि आता माजी मंत्री राम शिंदे, यांनीही ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

राम शिंदेंनी ट्विटरवरुन भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला आहे. राम शिंदे म्हणाले, 'विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदसेठी नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील असे म्हटले होते. त्या अनुषंगाने मा. पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास (त्यामुळे श्री. रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला. जो अभ्यास मला आणि इतरांना जमला नाही.'

या ट्वीटच्या माध्यमातून राम शिंदेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाना साधल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानंतर, चंद्रकांत पाटील म्हणाल होते की, नेत्यांना स्वत:च स्वत:ला समजावून घेण्यास सांगितले होते. त्यानंतर 11 मे रोजी पंकजा मुंडेंनी स्वत: शिकत असल्याचे ट्विट केले. त्यानंतर भाजपने आपला उमेदवार बदलून, पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय रमेश कराड यांना उमेदवारी दिली.

पंकजा मुंडे यांचे ट्वीट

बातम्या आणखी आहेत...