आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगनावर निशाणा:टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही कंगना रनोटची विकृती, कुणाला किती महत्त्व द्यायचं हे आम्हाला राज ठाकरेंनी शिकवलंय - अमेय खोपकर

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सूक आहेत, असं कुणाला वाटत असेलही, पण...

मुंबईतील परिस्थिती पाकव्याप्त काश्मीरसारखी झाली आहे असे म्हटल्यानंतर कंगना रनोट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही अभिनेत्री कंगना रनौतची एक विकृतीच आहे. या विकृतीमागे कुणाचं डोकं आहे हेही आम्हाला नीट माहिती आहे. एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं, असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे' असे म्हणत मनसेने कंगनावर निशाणा साधला आहे.

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ही टीका केली आहे. कंगनाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, असं देखील अमेय खोपकर म्हणाले आहेत. 'कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सूक आहेत, असं कुणाला वाटत असेलही, पण कुणाला किती महत्त्व द्यायचं, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला शिकवलेलं आहे' असल्याचंही खोपकरांनी सांगितलं आहे.

या आहेत मनसेच्या दोन मागण्या
अमेय खोपकरांनी ट्विट करत म्हटले की, 'आमच्या दोन मागण्या आहेत. पहिली म्हणजे कंगनावर त्वरित मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरु करण्यात यावेत. त्याचबरोबर मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा', अशी भूमिका अमेय खोपकर यांनी मांडली.

सुशांत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या मुद्द्यावरून चित्रपट अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली. मुंबई पोलिसांची भीती वाटते, या कंगनाच्या वक्तव्यावर राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे. यावर कंगनाने मुंबईची परिस्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी झाल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर एकच वादंग उठले. तेव्हा कंगनाने ट्विट करत सर्वांना चॅलेंज दिलं होतं.

ट्विट करत कंगनाने काय चॅलेंज दिलं होतं?
'बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत आहेत म्हणून मी आता येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेल तेव्हा पोस्ट करेल. कुणाच्या बापात दम असेल तर रोखूनच दाखवा'

0