आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यभरातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. लेकराप्रमाणे वाढवलेले शेतकऱ्यांचे पीक त्यांच्या डोळ्यांसमोर पाण्यात वाहून गेले आहे. अनेक पीके ही आडवी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून काही तरी मदत मिळावी यासाठी सरकारकडे विनवणी शेतकरी करत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
मनसे नेते बाळानांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे हाल पाहून घराबाहेर पडण्यास सांगितले आहे. नांदगावकर यांनी शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांची कशी अवस्था झाली हे दाखवण्यात आले आहे. शेतकरी पीक वाहून गेल्यामुळे आक्रोश करताना दिसत आहेत. संपूर्ण शेतात पाणी साचल्याचे दिसत आहे.
बाळा नांदगावकर यांनी ट्विट केले की, 'मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.'
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.