आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राज ठाकरेंचे भाष्य:राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला, मांडले रोखठोक मत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. दरम्यान राम मंदिराचे ई-भूमिपूजन करण्यात यावे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत मांडले होते. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयावर भाष्य केले आहे.

याविषयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर व्हायलाच पाहिजे, ज्यासाठी असंख्य कार सेवकांनी प्राणांची आहुती दिली होती. त्यामुळे राम मंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं. मात्र सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. भूमीपूजन होतंय त्याचा आनंद आहेच. मात्र त्यापेक्षा मंदिर निर्माण झालं तर जास्तच आनंद होईल असे ते म्हणाले. तसेच राम मंदिराचं भूमीपूजन धुमधडाक्यात व्हायलाच पाहिजे, ई-भूमीपूजन कशाला हवं? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.