आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मनसेप्रमुख राज ठाकरे अयोध्येला जाणार? कांचन गिरी आणि सूर्याचार्य यांनी राज ठाकरेंची घेतली भेट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांचन गिरी आणि जगद्गुरू सूर्याचार्य यांनी सोमवारी (ता.१८) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. कांचन गिरी आणि सूर्याचार्य यांनी राज ठाकरेंना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले आहे. येत्या दिवाळीत राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे आणि कांचन गिरी यांच्यात अर्धा तास बैठक झाली. हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी कांचन गिरी यांनी राज यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला असल्याची चर्चा होती. त्यानंतर झालेली आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. कांचनगिरी आणि जगद्गुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरेंच्या भेटीआधी शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. परप्रांतीयांच्या मुद्यावरून कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका देखील केली होती. त्यानंतर कांचन गिरी यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मागील वर्षी दसऱ्याला मनसेने “गर्व से कहो, हम हिंदू है,’ अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते. तसेच, मनसेने झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याची चर्चा आहे.

जुना आखाड्याशी संबंधित माँ कांचनगिरी
गुरू माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-५ मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केले होते. सध्या हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...