आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवानंतर मनसेचा विदर्भ प्लान?:नाशिक, पुण्यानंतर राज ठाकरे आता नागपूर, विदर्भ दौरा करणार; काल आशिष शेलारांची घेतली होती भेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गणेशोत्सानंतर विदर्भ दौरा करणार असल्याची चर्चा आहे. सध्या भाजपचे अनेक नेते राज ठाकरे यांच्या संपर्कात असून, काल रात्री मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. तर राज ठाकरे देखील मनसे वाढवण्यासाठी चांगली कंबर कसताना दिसत आहे. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर म्हणजेच गणेश उत्सव संपल्यावर राज ठाकरे नागपूरसह विदर्भाचा दौरा करण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा समोर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर टीकास्त्र करताना दिसत आहे. मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचे वक्तव्य केले होते. तसेच नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यातही राज ठाकरेंनी आपण बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा पुढे चालवत आहोत. त्यासाठी आपल्याला चिन्हाची किंवा पदाची गरज नाही. असे ते म्हणाले होते, त्यामूळे त्याचा हा विदर्भ महत्वाचा मानला जातोय.

गणेशोत्सानंतर करणार दौरा?

राज ठाकरे हे नागपूर आणि विदर्भ दौरा करणार आहेत. अनंत चतुर्दशी संपल्यानंतर ते हा दौरा करणार असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांच्या या दौऱ्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

भाजपला होणार फायदा?

शिवसेनेच्या आमदारांना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले आहे. या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान मुंबईत शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजप राज ठाकरेंना सोबत घेण्याची शक्यता आहे.

भाजपचे मिशन मुंबई

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर असली असून, जेपी नड्डा आणि अमित शहा पाच सप्टेंबर रोजी मुंबईचा दौरा करणार आहेत. मुंबईचा महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप मोठ्या ताकदीने प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात आता राज ठाकरे यांनी जर भाजपसोबत युती केली, तर मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला मदत होईल.

राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया

राज ठाकरेंवर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर दोन महिने आराम केल्यावर राज ठाकरे हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. अशात राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे हे जर विदर्भात गेले तर तिथल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आणखी जोर मिळेल. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...