आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेवर मोठा आरोप:मनसेचे नगरसेवक चोरता-चोरता शिवसेना आमच्या सभेचे फोटोही टिझरसाठी चोरू लागली- गजानन काळे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नकली रुप समोर आले असून 14 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेने आज प्रदर्शित केलेल्या टिझरसाठी मनसेचे फोटो वापरले आहेत. असा आरोप करून मनसे नेते गजानन काळे यांनी ​​​​​​''मनसेचे नगरसेवक चोरता -चोरता शिवसेना फोटो आणि व्हिडिओही चोरत आहेत असा आरोप केला आहे.

शिवसेनेची 14 मे रोजी मुंबईत सभा होणार आहे. या सभेत मी विरोधकांना उत्तर देईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच आता या सभेवरुन मनसेने नवीन आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेनेला या आरोपाचे उत्तर द्यावे लागणार आहे.

काय म्हणाले मनसे नेते गजानन काळे

मनसेचे नेते गजानन काळे म्हणाले की, आज सकाळी शिवसेनेच्या अधिकृत टिझर प्रदर्शित केले. त्यातील फोटो हे मनसेच्या सभेचे आहेत. गुडीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेतील फोटोज शिवसेनेच्या टिझरसाठी वापरले गेले आहेत असा आरोपही गजानन काळे यांनी केला आहे.

शिवसेना नव्हे चोरसेना नामकरण करा

राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो शिवसेनेने टिझरसाठी चोरले आहेत. त्यांना आता चोरण्याचेच काम असून मनसेचे नगरसेवक चोरता-चोरता आता शिवसेना टिझर चोरत आहे. असली नकलीच्या गप्पा मारताना आता शिवसेनेचे नकली हिंदुत्व उघडे पडत आहे असा टोलाही गजानन काळे यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...