आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेची टीका:म्हणाले- ढोंगी हिंदुत्वावरून असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह राज्यातून अनेक शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरेंचा हा राजकीय दौरा नसल्याचे यापूर्वीच शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टीका केली आहे. ढोंगी हिंदुत्वावरून असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो अशा शुभेच्छा मनसेने दिल्या आहेत.

मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर पुन्हा हिंदुत्वावरून टीकास्त्र केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की “अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो. औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो. विधानपरिषदेत तरी एमआयएम व सपाची मदत न घेण्याची सुबुद्धी मिळो,” अशी टीका काळे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे अयोध्येत

काही दिवसांपुर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापुर्वी पूर्वतयारी आढावा घेतला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई हे देखील अयोध्येला गेले होते. त्यानंतर आता उद्या म्हणजेच 15 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असून सायंकाळी 5.30 वाजता ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत.

आदित्य ठाकरे 15 जून रोजी सकाळी अकरा वाजता लखनऊ विमानतळावर उतरतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता ते अयोध्येमध्ये जातील. येथे दुपारी 3.30 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...