आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडीसाठी मनसेचं आंदोलन:मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाधव यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि राज्यातील वाढते प्रकरणे यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाला विरोध केला आहे. मनसेकडून ठाण्यात आंदोलन सुरु असून शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. ठाण्यातील भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

आंदोलनादरम्यान, जाधव यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शिवसेनेला राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही, मात्र हिंदूंचे सण साजरे करताना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतो असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.

जाधव यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
आंदोलनादरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज्य सरकावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुंबईतील जुहूमधील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरासमोर असंख्य शिवसैनिक जमले होते. शिवसेनेच्या शाखेसमोरही काल नारायण राणे कुडाळमध्ये आले तेंव्हा शंभरेक कार्यकर्ते होते, हे राज्य सरकारला चालत. राजकारण करताना शिवसेनेला कोरोना आडवा येत नाही, मात्र हिंदूचे सण येताच कोरोना वाढतो असा सवालही त्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला आहे.

राज्यात मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन
राज्यात एकीकडे दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक आहे. तर दुसरीकडे, भाजप राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन करत आहे. मात्र, सरकार कोरोनाचे कारण देत मंदिरे उघडत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार करत आहे. राज्यभरातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुण्यातील कसबा परिसरातील आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

बातम्या आणखी आहेत...