आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अव्वाच्या सव्वा वीज बील:हे म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावर प्रहार करणं आहे, मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत करून घेऊ नका, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. आता याची दखल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा असे पत्र त्यांननी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या विषयावर लक्ष घालावे असेही या पत्रात म्हटले आहे.

या पत्रात लिहिलेय की, महावितरण, बेस्टसह खासगी वीज कंपन्यांना समज द्या, अन्यथा या वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल. कोरोना असला तरी अशा विषयात मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत करून घेऊ नका, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित दिला आहे.

पत्रात लिहिलेय की, खासगी वीज कंपन्या असो किंवा महावितरण असे किंवा बेस्ट सर्वांनी एकत्रितपणे राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवण्यात आली ती शब्दशः सामन्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची सरासरी वीज बिल पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यात विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत. त्यावरुन त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल.असं या पत्रात म्हटलं गेलं आहे.